मुठाई नदी महोत्सव

मुठाई नदी महोत्सव २८ नोव्हेंबरला भारतीय नदी दिनाच्या निमित्ताने साजरा केला जातो. विविध नदी विषयक कार्यक्रम ह्या  दरम्यान आयोजित केले जातात.

स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय कुठलीही  नदी सुधार योजना यशस्वी होणार नाही असे आम्हाला वाटते. लोकांच्या मनात नदी बद्दल स्थान निर्माण करणे आवश्यक आहे. मुठाई नदी महोत्सव हे त्याच दिशेने टाकलेले  पाऊल आहे.

मुठाई नदी महोत्सव २०१५ व २०१६ ची झलक

आपल्याला मुठाई नदी महोत्सवात सहभागी व्हायचे असल्यास

पुणे : पुण्यात हा महोत्सव मुठा, मुळा, पवना, राम व देव नदी साठी साजरा केला जातो. विविध संस्था तो आयोजित करतात. आपण खालील फॉर्म भरलात तर आम्ही तुम्हाला संबंधित संस्थेची माहिती पाठवू.

अन्यत्र: महाराष्ट्रात काही नद्यांसाठी हा उत्सव साजरा केला जातो. तुम्हीही तुमच्या नदीसाठी हा उत्सव सुरु करू शकता. त्यासाठी लागणारी सर्व मदत आमच्याकडून मिळेल. कृपया खालील फॉर्म मध्ये आपली माहिती भरा.