मुठाई नदी फेरी

मराठी भाषांतर: Language Service Bureau

मुठाई नदीकाठी फेरफटका (मुठाई रिव्हर वॉक) याची सुरुवात “जीवितनदी” आणि “जनवाणी” या संस्थांच्या संयुक्त उपक्रमाने झाली. विरासत पुणे मंचाच्या (प्लॅटफॉर्म) अंतर्गत जनवाणीच्या “हेरीटेजवॉक” (सांस्कृतिक वारसा) या संकल्पनेपासून प्रेरणा घेत हा उपक्रम सुरू केला गेला.

हेरिटेज वॉकच्या तुलनेत याचे वेगळेपण म्हणजे यात नदीच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांबरोबर पर्यावरण संबंधी वैशिष्ट्ये पण सांगितली जातात. नदी परिसरात एका गटासोबत (साथीदारासोबंत) चालत असताना, गटाचा मार्गदर्शक नदीचा इतिहास सांगतो, वेगवेगळ्या महत्त्वाच्या खुणा दाखवतो आणि नद्यांचे पर्यावरण म्हणजे काय हे समजावून सांगतो.

नदीकाठी फेरफटका (रिव्हर वॉक) हा उपक्रम का?

ज्या ठिकाणी पाण्याचे खात्रीशीर स्त्रोत आहे, अशाच ठिकाणी मानवी वसाहत असते. उदा: सिंधू, नाईल नदीकाठी असलेली वसाहत तसेच टायग्रीस आणि इयुफारेट जवळ असणारी मेसोपोटेमियाची वसाहत इ. खर तर, मेसोपोटेमिया या शब्दाचा अर्थ म्हणजेच “नद्यांच्या मधोमध”

 

तसेच, पुणे शहर मुठा नदीकाठी वसलेले आहे. मुठा नदी ही पुणे शहराची जीवनदायिनी होती आणि अजूनही आहे. विद्यमान काळात मात्र हे नाते इतके स्पष्ट राहिले नाही.  जी व्यक्ती पाण्यासाठी रोज नदीकाठी जाते, त्या व्यक्तीला नदीचे महत्व समजते. शहरामध्ये थेट धरणांपासून मिळणाऱ्या पाण्यामुळे, प्रत्यक्ष नद्यांशी असलेली नाळ  हरवली आहे. रोजच्या आयुष्यातही आपण पुलावरून जाताना, पुलाखाली असलेल्या नदीचे अस्तित्व विसरत चाललो आहे.

 

प्रदूषण, अतिक्रमणे, ढासळणारा पर्यावरणाचा तोल, या सगळ्या कारणांव्यतिरिक्त लोकांच्या औदासीन्यामुळे नदी सर्वाधिक प्रभावित होते. “सार्वजनिक वस्तूंची समस्या” याचे हे सर्वोत्तम उदाहरण होय. या समस्या सर्वांच्याच आहे मात्र त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. त्यामुळेच नदीमध्ये व नदीकाठी फेकला जाणारा कचरा, प्लास्टिकचा वाढता ढीग, मलमा  इ. यांचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. जो पर्यंत आपल्याला धरणातून स्वच्छ पाणी मिळते, तोपर्यंत आपल्या स्वच्छ नदीचे रूपांतर सांडपाणी आणि कचरा वाहून नेणार्‍या नाल्यात होत आहे याचे आपल्याला काहीही वाटणार नाही.

 

जगभरातील अनेक प्रकल्पांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की नद्यांना नवीन आयुष्य द्यायचे असेल तर  नागरिक आणि सरकार एकत्र येऊन उपाययोजना केल्यानेच हे शक्य आहे. लोकांचा सहभाग नसेल तर नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणतीही धोरणे किंवा कायदे फारसे उपयोगी पडत नाहीत.

 

नदीकाठी फेरफटका (रिव्हर वॉक) या उद्देशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाउल आहे, असा जीवितनदी गटाचा विश्वास आहे. या उपक्रमाने सामान्य जनता नदीच्या अजून जवळ येईल आणि नदीचा इतिहास, पर्यावरणशास्त्र, भूगोल आणि नदीचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम, याबद्दल संवेदनशील होईल. आम्हाला वाटते की लोकांना पुन्हा नद्यांशी जोडणारा आणि नदी प्रश्नांबाबत जागरूकता वाढवणारा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

 

मुठा किती वर्षे जुनी आहे? किती वर्षांपासून लोकाची वसाहत या नदीकाठी आहे? मानव येण्यापूर्वी येथील भूप्रदेश कसा होता? आणि या नदीमुळे आजच्या पुणे शहराचे रूप कसे बदलत गेले?

 

नदीत असलेले दगड, उध्वस्त झालेला मंदिराचा घाट इ. सगळ्याच्या मागे सांगण्यासारख्या काहीतरी गोष्टी आहेत. शहरातील या माहिती नसलेल्या भागाचा आपण एकत्र शोध घेऊया.

 

तुमच्या रविवारच्या सकाळचा केवळ दीड तास आम्ही मागत आहोत आणि त्याबदल्यात नदीकाठी घालवलेल्या वेळेची , मनोरंजक यात्रेची आठवण  तुम्ही परत घेऊन जाऊ शकता.

लोकांना नदीच्या अजून जवळ आणणे, नदी आणि नदीच्या प्रश्नांबाबत जागरूक करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजवर सर्व वयाच्या आणि सर्व क्षेत्रातील सुमारे ५००० लोकांनी यात सहभाग घेतला आहे.

 

नदीकाठी फेरफटका (रिव्हर वॉक) हा उपक्रम रविवारी आयोजित केला जातो. विनंतीनुसार या वेळात बदल केले जाऊ शकतात, विशेषतः मोठे गट, शाळा आणि महाविद्यालयांसाठी.

नदीसाठी फेरफटका (रिव्हर वॉक) शुल्क तक्ता

माहिती सोमवार ते शुक्रवार शनिवार, रविवार
विद्यार्थी
100
50
ज्येष्ठ नागरिक
100
50
प्रौढ
200
100

खालील जागी तपशील भरा. तुम्ही दिलेल्या ई-मेल आय-डी वर आम्ही तुम्हाला पोच पावतीचा ई-मेल पाठवू. ईमेलमध्ये पुढील गोष्टींचा तपशील असेल. –ऑनलाइन पेमेंट तपशील – कोणत्या वस्तू बरोबर आणाव्या – मार्गदर्शक स्वयंसेवकाचे तपशील