<span class="hpt_headertitle">Mutha ani Mi</span>

Mutha ani Mi

There are so many reasons why not to work for the river.

“It is the job of the government”, “What I alone can achieve”, “Unless people stop throwing garbage in the river, what I do will have no effect” and so on.

Such thoughts never discourage people like Ashwini. In this blog by Ashwini, she explains how she went to the river the first time, and whys she kept going there every Sunday as part of “Adopt a River Stretch” program.

मुठा नदी आणि मी

आदितीची ब्लॉग लिहाण्याबद्दल ची पोस्ट वाचली आणि झरझर मुठा नदी बरोबर चे दिवस आठवत गेले.अजुनही आठवत जिवीतनदी दत्तक घेऊ नदी किनारा विठ्ठलवाडी, पुणे ह्या उपक्रमाबद्दल माहिती फेसबुकवर वाचली. आपण ह्यात भाग घ्यायचाच अस मनोमन ठरवलं. माहीत नव्हत काय करणार? कस करणार? फक्त आपण स्वच्छता करायला जाणार एवढ समजल होत.. कॉलेज मधे NSS मधे खूप काम केले होते. तेव्हडा काय तो कामाचा अनुभव होता. ४ जून,२०१७ माझा आणि मुठा नदीचा प्रवास सुरू झाला.


अरे हि मुठा नदी आहे तर.. ही एक कोटी वर्षाची आहे…DO (Dissolve Oxygen) पाणी जिवंत आहे का मेलेल?


याचे मापक, Raiperian झोनDuckweed..अशा एक ना अनेक गोष्टी कानावर पडत होत्या. अरे लोक नदीला गटार तरी म्हणत होते शासनाने ह्यावर उपाय योजना केल्या पाहिजेत हे सुद्धा मला ह्या आधी माहिती नव्हते…. इतकी मी आडाणी होते….


माझ्या मनाची फार धांदल उडायची 🙂 तेव्हा समजल अज्ञानात सुख काय असत ते. अशातच कधी पुढचा रविवार यायचा अस व्हायचं.
सुरुवातीला नदीच्या काठी पुंडलिक मंदिराजवळच देवांचे फोटो, देशी दारुच्या बाटल्या, प्लॅस्टिक चे ग्लास, गुलाबी-पिवळ्या-काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, छोट्या छोट्या प्लॅस्टिक पिशव्यांमधे तांदूळ, गहू, कुंकू, बुक्का, गुलाल, ल्हाया, गुळ, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधे कोंबलेले सडलेले र्निमाल्य, थरमाकोल चे तुकडे, लाकडी तुटलेले देव्हारे इत्यादी कचरा गोळा करायचो.
मला मंदिर परिसरातील कचरा गोळा करताना नदीच्या पात्रातील कचरा दिसायचा. नंतर नंतर आम्ही काही जण नदी पात्रतील कचरा काढायला सुरुवात करायला लागलो. पात्रातील कचर्याचे स्वरूप काही वेगळ असायच.


सुंदर दिसणारी आणि तितकीच घातक अशी जलपर्णी. बराचसा नदीच्या पात्राचा भाग हा जलपर्णीने व्यापलेला असायचा. त्या जलपर्णी जसं जसं काढायचो तसं तसं खाली गटराचा वास भसकन नाकात जायचा आणि जणू काही अकस्मात मिळणाऱ्या खजिन्या सारखा कचरा आम्हाला दिसायचा आणि काही वाहून जायचा. जमेल तेवढा कचरा पात्रातून बाहेर काढायचो. कुदळ, फावडे, लांब काठ्या इत्यादी शस्त्रांचा उपयोग करु लागलो. त्या कचर्यात नारळपाणी पिल्यानंतर चे नारळ सडलेल्या अवस्थेतील, न फोडलेले नारळ, फोडलेले सडलेले नारळ,  वापरलेले डायपर, सॅनिटरी पॅड, कॉन्डोम, अंत्यविधी साठी वापर ले जाणारे साहित्य इत्यादी गोष्टी पात्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचो.
पात्रता जिथे पाणी आडून रहायचे तिथे काळ्या रंगाचे बुडबुडे दिसायचे आम्ही त्या पाण्याला वाट देण्याचा प्रयत्न करायचो. अस वाट दिलेल्या पाण्यात पुढच्या आठवड्यात सुधारणा दिसायची. किती पटकन सावरणारा निसर्ग असतो हे जाणवायचं.
अस जमेल तितक स्वच्छ केल्या वर अस वाटायचं की तो पुढचा पात्राचा टप्पा स्वच्छ करु, परंतु तस क्वचित व्हायच.  पुढच्या आठवड्यात जैसे थे परिस्थिती असायची.


लोकसहभागातूनच नदी आणि परिसर स्वच्छ होणार हे लक्षात आलं.
आम्हाला तिथे मुंगूसाच कुटुंब दिसायच आणि एक वेगळी च ऊर्जा मिळायची जणू काही जंगलात वाघ बघितल्या सारख वाटायचं मला🙂 (अर्थात मी जंगलातला वाघ पहिला नाही). कुठे रंगीबेरंगी चतुर, फुलपाखरे, बेडूक मासे, बेडूक, खेकडे, मुंगळे,मुंग्या, विरुळा, लाजरीपाणकोंबडी, तारवाल्या, जंगली मैना, होला,वल्गुली, कोतवाल, फुलटोच्या, शिंपी आणि त्याच घरट,चिमण्या, घारी, एकदा मोरही दिसला होता, खंड्या,धनेश, ठिपके वाले मुनिया, लाल मुनिया (मला एकदाच दिसले पावसाळ्यात ऑगस्ट २०१७), हिवाळी पाहुणे हि यायचे शक्यतो गटारीतल्या किडे खाणारे.वर्षभरात खाण्याचा पुरवठा कसा आहे त्यावर पक्षी दिसायचे.
पावसाळ्यात खडकवासला धरणाचे पाणी सोडले की नदीचे खर रुप दिसतं. जरूर पहावे त्या रुपाला. आपण काय गमावले आहे हे लक्षात येते. आणि हिच भावना आपल्याला नदी साठी काम करायला प्रेरणा देईल…


एकदा बोधनकर सर मार्गदर्शनासाठी आले होते त्यांनी प्लॅस्टिक अतिवापर, त्याचे होणारे नुकसान ह्यावर बोलत असताना सांगितले की मुठा नदी मधे काही दशकांपुर्वी माशांच्या ७०च्या आसपास जाती सापडायच्या आता फक्त ४जाती सापडतात तेही गटराच्या पाण्यात जिवंत राहणार्या जाती. खुप अस्वस्थ करणार वाक्य होत माझ्या साठी. नदीचे पाणी त्या माश्यांनसाठी ऑक्सिजन पुरवू शकत नाही. त्यात किती तरी मासे मरुन गेले असतील देव जाणे. आपल्याला जराकुठ गुदमरल तर कस होत ना, त्यांना कस झाल असेल ना? आता घण कचर्यापेक्षा नदी त मिसळणार्या कचर्यावर काम करायला हवं अस समजल आणि ते तितकस सोपं नाही हेही आपसूक समजत गेल. कारण आपल्या वैयक्तिक रोजच्या जीवनात वापरात येणाऱ्या गोष्टींमुळे नदी प्रदुषित होते. जसं १) रंगेबीरंगी टुथपेस्ट, २)अंगाचा सुगंधी साबण, ३) शॉम्पू, ४)कपड्याचा साबण, ५)बाथरूम क्लिनर ,६)टॉयलेट क्लिनर ७)भांड्याचा साबण इ. ह्या प्रोडक्ट मध्ये जगभरातील केमिकल असतात त्या मुळे नदी चे पाणी प्रदूषित होते परिणामी पाण्यात ऑक्सिजन विरघळत नाही आणि मासे पाण्यात जिवंत राहू शकत नाही. तेव्हापासून मी पुर्णतः टूथपेस्ट बंद करून दंतमंजन वापरते.अंगाच्या साबणा ऐवजी उटणं, बेसनपीठ, ज्वारीचे पीठ याचा उपयोग करते, केस धुण्यासाठी शिकेकाई चा वापर करते,  फरशी पुसण्यासाठी / बाथरूम क्लिनर/ हँड वॉश/ टॉयलेट क्लीन करण्यासाठी Eco Clean / ग्रीन फार्मसी चे प्रॉडक्ट्स वापरतो. आता ह्या सफाईसाठी व्हेनिगेर चा वापर करण्याचा विचार चालू आहे. त्याची जवळपास उपलब्धता नसल्याकारणाने हा पर्याय अजून अमलात आला नाही. अजून बरेचसे बदल करायचे आहेत. हे बदल होतील हे नक्की🙂 थोडा वेळ लागेल.

माझा आणि नदीचा सुंदर आणि सुधारित प्रवास चालू झाला आहे. तुम्ही कधी सुरू करताय तुमचा वैयक्तिक आणि नदीचा प्रवास.☺👍

Ashwini Bhilare- Patil – Project Coordinator- Jeevitnadi Adopt a River Stretch, Vitthalwadi

Ashwini Bhilare Patil Jeevitnadi team

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of