What bothers me, does it bother the river as well?

What bothers me, does it bother the river as well?

What bothers us, ever wondered, if same thing bothers our river as well? IS she equally pained by the apathy of citizens? We are happy to share these musings by Ashwini, our project coordinator at Adopt a River Stretch, Vitthalwadi project

खुपणारी एक गोष्ट मुठा नदीलाही खुपत असेल का?
 
मुठा नदी विठ्ठलवाडी येथे काम करताना खूप गोष्टी खुपायच्या त्यातली एक गोष्ट म्हणजे नदीच्या पल्याडल्या काठाला होणारा मैला विसर्जन.
 
आम्ही रविवारी सकाळी उठून तिथे स्वच्छता करायला यायचो आणि काही लोक विसर्जनाच काम करीत असायचे.
सुरुवातीला कदाचित सगळ्यांच्या नजरेस पडायचं तरी त्यावर आमची चर्चा नाही होयची. चर्चा तरी काय करणार असा काहीसा प्रश्न असावा. इथे लोकांना निर्माल्य नदीत टाकू नका, कचरा टाकू नका हे समजत नाही तर मैला टाकू नका हे कसं आणि कुठे सांगायचे हा मोठा प्रश्न होता आहे आणि किती दिवस माहीत नाही. तरी रेटून एकदा हा विषय काढलाच. सगळ्यांनाच ती गोष्ट खटकत आहे हे समजलं.
 
विठ्ठलवाडी येथील मुकादम आमच्या सोबत काम करायला असायचे ते सांगत होतें की एक योजना आणली होती सरकारने की गुलाब फुलाची. कोणी विसर्जनाला आला की त्याला लाल गुलाबाचं फुल द्यायचं. ☺
 
गमतीदार होत हे 😀. असो मग असा मुद्दा उपस्थित झाला की त्याना स्वच्छता गृहांची उपलब्धता नसावी. आता दरवाजा बंद तो बिमारी बंद ही योजना काय फक्त ग्रामीण भागा पुरतीच आहे की काय? असा प्रश्न पडला मला.
 
अस कळाल की ते लोक कामगार लोक आहेत. बांधकाम करणारे वेठबिगारी आहेत. म्हणजे त्याची सोय करणे हे त्या बिल्डर्स ची नाही का? 
 
ह्या वर मला वैयक्तिक पातळीवर अजून तरी काही करता आल नाही. 

Ashwini Bhilare 

Project Coordinator – Adopt a River Stretch, Vitthalwadi

Ashwini Bhilare Patil Jeevitnadi team

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of